चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे म्हेत्रेवस्ती दवाखाना या ठिकाणी डेंगू, मलेरिया व स्वाईन फ्लू आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी डॉ. संध्या भोईर व अमित सुतार आदी उपस्थित होते. यावेळी माहितीपत्रके आणि प्रात्यक्षिकांव्दारे माहिती देण्यात आली. डॉ. भोईर यांनी नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, त्याविषयी घ्यावयाची काळजी घेणे याबाबत चर्चा व प्रश्न, उत्तर माध्यमातून माहिती दिली.
सोबत अमित सुतार यांनी नागरिकांना बाटलीमध्ये जिवंत डास आळी कशा तयार होतात याची प्रात्यक्षिकाव्दारे माहिती दिली. डेंग्यूसाठी रक्तजल तपासणी मोफत असून खासगी लॅबमध्ये यांनी डेंग्यूसाठी रक्तजल माफक दरात तपासणी करण्याबद्दल बद्दल सूचना देण्यात आली. यावेळी कीटकनाशक विभागाचे आरोग्य निरीक्षक अमित पिसे उपस्थित होते.