Munawar Faruqui | स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने एका मुलाखतीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. आज जरी मुनव्वर यशाच्या उंच शिखरावर असला तरी त्याने कठीण परिस्थितीचा मोठा सामना केला आहे. मुनव्वर फारुकीच्या दीड वर्षांच्या मुलाला कावासाकी नावाचा आजार झाला होता. त्यादरम्यान त्याच्या मुलाच्या उपचारासाठी पैसे नसल्याचे त्याने एका पॉडकास्टमध्ये सांगितले.
जेनिस सिक्वेरासोबतच्या पॉडकास्टमध्ये मुनव्वर म्हणाला की, ‘ती परिस्थिती मला अजूनही घाबरवते. माझा मुलगा तेव्हा दीड वर्षाचा होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर त्याला कावासाकी हा आजार असल्याचे समजले. त्याला तीन इंजेक्शन्सची गरज होती आणि एका इंजेक्शनची किंमत २५००० रुपये होती म्हणजे मला ७५ हजार रुपये हवे होते पण माझ्याकडे फक्त ७००-८०० रुपये होते.’
त्यावेळी त्याने लोकांकडे पैशांची मदत मागितली होती. तो मुंबई सेंट्रलला गेला, पैसे घेऊन तीन तासात परतला होता.त्या दिवसानंतर मुनव्वरने कधीही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होणार नसल्याचे ठरवल्याचेही सांगितले. Munawar Faruqui |
कावासाकी आजार काय?
कावासाकी या आजाराला ‘मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ असेही म्हणतात. हा आजार शरीरातील रक्तवाहिन्यांशी संबंधित असून ज्यामध्ये हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि आतड्यांवर परिणाम होतो. यामध्ये सूज येणे सुरू होते, हा आजार फक्त लहान मुलांनाच होता. Munawar Faruqui |
करिअर आघाडीबद्दल बोलायचे तर, मुनव्वर स्टँडअप कॉमेडियन आहे. ‘बिग बॉस 17’ चा मुनव्वर फारुकी विजेता आहे. मुनव्वरसोबत या शोमध्ये अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अरुण हे अन्य चार स्पर्धक अंतिम फेरीत होते. मात्र सर्वात जास्त मत मिळवत त्याने बिग बॉस 17 च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. अलीकडेच तो एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या ग्रँड फिनालेमध्ये दिसला होता.