Mumbai Dabbawala – गेली 135 वर्ष मुंबईत जेवणाचे डबे पोहचवणारा डबेवाला आर्थिक क्षमता नसल्यामुळे मुंबईत आपले हक्काचे घर घेऊ शकला नाही. त्यामुळे बहुतांश डबेवाले झोपडपट्टी, भाड्याच्या खोलीत, गावकीच्या खोलीत, मंडळाच्या खोलीत रहात आहेत.
या डबेवाल्यांना सरकारने परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. पण डबेवाल्या कामगारांचे मासिक उत्पन्न तुटपुंजे आहे. या उत्पन्नावर त्यांना कोणतीही बँक 25 लाखांचे कर्ज देऊ शकत नाही.
त्यामुळे डबेवाला कामगार यांचा समावेश “अल्प उत्पन्न” गटात करावा व त्यांना साधारणतः 10-12 लाखांत मुंबईत घरे उपलब्ध करून दिली जावीत, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.