मुंबई : सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा फक्त एका मताने पराभव झाला होता. या पराभवाला शिवेंद्रराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे पॅनल असल्याचा आरोप करण्यात येत होता. माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, असा आरोप शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रसिंह भोसले यांच्यावरकेले होते. त्यांच्या आरोपांना आता शिवेंद्रसिंह भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिशोब चुकता करायला मी कधीही तयार, आहे, पण मुंबईच्या गुंडगिरीला ‘सातारी हिसका’ सोसणार नाही, शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे.
ज्ञानदेव रांजणे यांच्या विजयी कार्यक्रमावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. शशिकांत शिंदे यांच्या अपयशात माझा संबंध नसल्याचे सांगत शशिकांत शिंदे यांना माझा हिशोब चुकता करायचा असेल तर मी कधीही तयार असल्याचे शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितले.
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, ‘तुमच्या बगलबच्च्यांच्या उद्योगांमुळेच तुमचा पराभव झालाय. त्यांना तुम्ही आवरलं असतं तर तुमचा पराभव झाला नसता. आम्हाला हिशोब चुकता करायच्या धमक्या देऊ नका. हिशोब चुकता करायची वेळ आली तर आम्ही पण साता-यातच जन्मलोय. तुमच्या मुंबईच्या गुंडांना आमचा हिशोब परवडायचा नाही.’
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मला पाडण्यात शिवेंद्रराजे भोसले यांचा हात आहे. यामध्ये त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केली, असा दावा शशिकांत शिंदे यांनी पराभवानंतर केला होता. शशिकांत शिंदे यांच्या आरोपांवर शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.