धक्कादायक! मुंबईतील महिलेवर दिल्लीत 5 स्टार हॉटेलात बलात्कार

नवी दिल्ली – मुंबईत ईव्हेंट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एका महिलेवर दिल्लीत दोन धाबा मालकांनी एका पंचतारांकित हॉटेलात बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोन धाबा मालकांना अटक केली आहे.

मिकी मेहता वय 57 आणि नवीन डावर वय 46 अशी या दोन धाबा मालकांची नावे आहेत. या महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार तिची मिकी मेहता नावाच्या इसमाशी फेसबुकवरून ओळख झाली होती. त्या आधारे त्याने तिला काहीं कामानिमीत्त दिल्लीला बोलावले होते. त्यावेळी त्याने त्याचा मित्र नवीन डावर याच्याशी तिथे ओळख करून दिली होती.

ती दिल्ली विमानतळा नजिक एका पंचतारांकित हॉटेलात उतरली होती. तेथेच तिच्यावर या दोघाकडून 18 आणि 19 नोव्हेंबर दरम्यान बलात्कार करण्यात आला अशी तिची तक्रार आहे. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना अटक करून कारागृहात धाडले आहे.

दिल्लीत रोज सरासरी सहा बलात्काराची प्रकरणे होत आहेत. तथापि यातील 98 टक्के प्रकार नातेवाईक किंवा माहितीतील व्यक्तींकडूनच होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.