वाशी रेल्वेस्थानकातील पेंटाग्राफमध्ये लागली आग; नियंत्रण मिळवण्यात यश

मुंबई – मुंबईतल्या वाशी रेल्वेस्थानकात पनवेलला जाणाऱ्या लोकल ट्रेनला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग रेल्वेतील पेंटाग्राफमध्ये लागली होती. या घटनेनंतर वाशी रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले आहे.

रेल्वेमध्ये आग लागल्यानतंर लगेचच रेल्वे रिकामी करण्यात आली. ही आग विझवण्याकरता रेल्वे स्थानकावरील विद्युतप्रवाह बंद करण्यात आला आहे. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, या घटनेमुळे रेल्वेमार्गावरील इतर लोकल रेल्वे धीम्यागतीने सुरू आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here