Maharashtra Mahayuti Government – महायुतीने बुधवारी महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा केला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणवीस उद्या, 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. भाजपच्या बैठकीत फडणवीस यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राज्यपाल सी. राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तीन महायुती नेत्यांनीही माध्यमांशी संवाद साधला.
सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यपालांना भेटून राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. राज्यपालांनी आम्हाला उद्या संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. आमच्या युतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मला महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याची विनंती राज्यपालांना केली आहे. राज्यपालांनी सर्व विनंत्या मान्य केल्या आणि उद्या संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रित केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही पदे ही केवळ तांत्रिक पदे आहेत. महाराष्ट्रासाठी आपण सर्व मिळून काम करू. आगामी बैठकीत मंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
Mumbai: Shiv Sena chief Eknath Shinde, BJP leader Devendra Fadnavis, NCP chief Ajit Pawar stake claim to form the government in the state.
Devendra Fadnavis to take oath as CM of Maharashtra tomorrow, 5th December pic.twitter.com/tZoAaSzkhn
— ANI (@ANI) December 4, 2024
शिंदे यांच्या पाठिंब्याबाबत फडणवीस काय म्हणाले?
फडणवीस म्हणाले, “शिवसेना विधीमंडळ पक्षाचे प्रमुख या नात्याने एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाची शिफारस करणारे पत्र दिले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि विधीमंडळ पक्षाचे प्रमुख नेते अजितदादा पवार यांनीही असेच पत्र दिले आहे. आमच्यासोबत असलेल्या सर्व अपक्ष आमदारांनी राज्यपालांना पत्रे सादर केली आहेत. नवीन सरकारचा शपथविधी सोहळा उद्या संध्याकाळी 5.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. उद्या कोण शपथ घेणार हे आम्ही संध्याकाळपर्यंत ठरवू.
मंगळवारी सायंकाळी शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत ते म्हणाले, काल मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की, त्यांनी या सरकारमध्ये आमच्यासोबत असावे, ही महायुतीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ते आमच्यासोबत असतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करू.