“मुंबई सागा’चे पहिले पोस्टर लॉन्च

बॉलिवुडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता संजय गुप्ता यांनी जेव्हा गॅगस्टार “मुंबई सागा’ची घोषणा केली, तेव्हापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर निर्मात्यांनी शुक्रवारी लॉन्च करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. पोस्टरमध्ये चित्रपटाची रिलीज डेट 19 जून 2020 दर्शविण्यात आली आहे. तसेच पोस्टरमध्ये काही जहाज बूडत असल्याचे दाखविण्यात आले असून बंदूकाही दिसत आहेत.

या चिपटात जॉन अब्राहम, इमरान हाशमी, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते प्रमुख भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 1980-90 च्या दशकातील असून तेव्हा बॉम्बे ही मुंबईत बदलत होती.

संजय गुप्ताने “मुंबई सागा’बाबत बोलताना सांगितले की, हा चित्रपट आतापर्यतचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे. 25 वर्षांमध्ये 17 चित्रपटांनंतर मला प्रेक्षकांना भव्यदिव्य आणि वेगळे असे काहीतरी द्यायचे आहे. मी भूषण कुमार यांचा आभारी आहे, ज्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला. “मुंबई सागा’ ही अशी गोष्ट आहे, जी स्क्रीनवर दाखविणे आवश्‍यक होती, असे त्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×