नवी दिल्ली – बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी स्टार कास्ट असणारा ‘मुंबई सागा’ हा सिनेमा शुक्रवारी सिनेमा गृहात प्रदर्शित झाला. त्यामुळे कोरोना मारामारीच्या काळात हा सिनेमा लोकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे.
कारण पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धमाकेदार एंट्री करताना चांगलाच गल्ला जमावाला आहे. ‘मुंबई सागा’ लॉकडाऊन नंतर सिनेमा गृहात प्रदर्शित झालेला पहिलाच सिनेमा आहे, ज्याने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सिनेमांमध्ये सर्वात जास्त नॉन हॉलिडे कलेक्शन केले आहे.
काही ठिकाणी सोशल डिसटन्सिंगची काळजी घेवून सिनेमागृहात हा सिनेमा 50% सीट बुकिंग केल्या जात आहेत. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 2.82 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता अंदाज लावला जात आहे की, हा सिनेमा चांगली कमाई करू शकतो. जवळपास एक वर्षांनी बर्याच सिनेमागृहा बाहेर पहिल्यांदाच हाऊसफुल्लचे बोर्ड दिसून आले.
महाराष्ट्रात बिझनेस प्रभावित
सध्या देशात बर्याच राज्यात रात्री संचारबंदी करण्यांत आली आहे. त्याचबरोबर अन्य नियमामुळे या सिनेमाच्या व्यवसायावर प्रभाव पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात प्रतिबंधामुळे या सिनेमाच्या व्यवसायाला सर्वात जास्त प्रभावित केले आहे. परंतु ज्या ठिकाणी प्रतिबंध लावले गेले नाहीत. त्या ठिकाणी सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहिला मिळाली.
सत्य घटनेवर आधारित
या सिनेमाचे दिग्दर्शन संजय गुप्ताने केले आहे. संजय गुप्ताचे आतिश (1994), कांटे (2002), शूट आउट अट लोखंडवाला (2007) आणि शूट आउट अट वडाळा या सारख्या अंडरवर्ल्ड गुन्हेगारांचे कथांना प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे. मुंबई सागा हा सिनेमा देखील अशाच सिनेमाची एक कडी आहे. त्याच्या सत्य घटनेच्या आधाराच्या दाव्यावर विश्वास ठेवला तर मुंबई सागा हा अंडरवर्ल्डच्या चर्चेतील भाई अमर नाईक आणि अश्विन नाईक यांच्या जीवनावर आधारित आहे. परंतु ते म्हणत आहे की, हे पात्र काल्पनिक आहे.