मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरली; अनेक गाड्या रद्द

पुणे – मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. मालगाडीचे ५ ते ६ डबे घसरल्याचीही माहिती समोर आली आहे. जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. आता या ठिकाणी हे डबे हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.

कर्जत ते लोणावळा दरम्यान असलेल्या छोट्या स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे भुसावळ एक्स्प्रेस, पनवेल पुणे पॅसेंजर, पुणे सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस या पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोल्हापूर कोयान एक्स्प्रेसही मुंबई ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. भुसावळ पुणे एक्स्प्रेसची यात्रा नाशिक रोड स्थानकात संपवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.