मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माझी अष्टपैलू खेळाडू ‘सुरेश रैना’ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावरील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकला असता ही कारवाई करण्यात आली. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्यानं ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.
या कारवाई दरम्यान सुरेश रैना, गायक गुरु रांधवा आणि बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खान यांच्या सह एकूण ३४ जणांविरोधात आयपीसीच्या कलम 188, 269, 34 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेव्हा पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी या क्लबमध्ये सुरेश रैना उपस्थित होता.
Police book 34 people including cricketer Suresh Raina & some other celebrities under Section 188, 269, 34 of IPC & provisions of NMDA after a raid at Dragonfly pub for keeping establishment open beyond permissible time limit & not following COVID norms: Mumbai Police
— ANI (@ANI) December 22, 2020