‘असली दिलवाले’ म्हणत मुंबई पोलिसांनी केलं शेट्टीचं कौतुक!

मुंबई – 2020 हे वर्ष सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते. अचानक आलेल्या कोरोना विषाणूच्या लाटेने जवळपास संपूर्ण जगात हाहाकार माजवला. सर्वच देशांत या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आणि लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अद्यापही म्हणावं असं कोणतंच प्रभावी औषध या रोगाची तीव्रता रोखू शकत नाही.

दरम्यान, या गंभीर परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून, महाराष्ट्र पोलिसांनी दिवसरात्र मेहनत घेतली. यावेळी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी ऑन-ड्युटी पोलिसांसाठी दिग्दर्शक ‘रोहित शेट्टी’ धावून आला होता. रोहित शेट्टीने मुंबई शहरभरात आठ हॉटेल्सची व्यवस्था केली, या हॉटेल्समध्ये पोलिसांना थोडा वेळ आराम, नाश्ता व जेवणसुद्धा देण्यात आले होते.

या संकटकाळात केलेल्या अशाच मदतकार्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी रोहित शेट्टीचा सन्मान केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. तसेच ‘असली दिलवाले’ अशा शब्दात पोलिसांनी रोहितच कौतुक केलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.