विराट कोहलीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा विकृत मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुंबई – टी-20 विश्‍वकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरूध्दचा सामना हारल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नऊ महिन्याच्या मुलीवर बलात्कार करण्याची समाज माध्यमांद्वारे धमकी देणाऱ्या विकृत व्यक्तीला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आले.

रामनागेश अलीबथिनी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो आयटी इंजिनिअर असून पीएचडी करण्यासाठी त्याने नोकरी सोडली आहे. तांत्रीक पुराव्याच्या आधारावर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात येईल. त्यानंतर त्याचा तपशील देता येईल, अशी माहिती बिकेसीमधील सायबर पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (ए) लैंगिक छळ, 506 (गुन्हेगारी हेतू), या शिवाय बालकांच्या लैंगिक छळाचा मजकूर प्रसिध्द केल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
या खेळाडूसह अन्य एका क्रिकेटरला भारताने पाकिस्तान विरोधात दहा गडी राखून सामना हारल्यानंतर ऑनलाईन द्वारे प्रचंड शिविगाळ सहन करावी लागली होती.

त्यात या बलात्काराच्या धमकीच्या ट्‌विटचा समावेश होता. दिल्ली महिला आयोगाने याचा शोध गेऊन कारवाई करण्याचे आद्रश दिल्ली पोलिसांना दिले होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्याला शोधून त्याला ताब्यात घेतले. हे ट्‌विट अत्यंत निंदाजनक असून आरोपीला अटक करावी, असे ट्‌विट आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलिवाल यांनी गेल्या आठवड्यात केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.