मुंबई – मुंबईतील सायन भागात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 7 किलो हिरोइन जप्त केले आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने ही कामगीरी केली असून एका ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या हिरोइनची किंमत 21 कोटी रुपये आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेवून महिलेला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या ड्रग्स प्रकरणाची लिंक राजस्थानातील प्रतापगढ परिसराशी असल्याचे समोर आले आहे. या कारवाईबाबत खुलासा करण्यासाठी आज दुपारी साडे बारा वाजता मुंबई पोलीस पत्रकार परिषद घेणार आहेत.
या पत्रकार परिषदेमध्ये राजस्थान आणि मुंबईशी असलेल्या ड्रग्स साखळीचा पर्दाफाश केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेत आणखी कोणती माहिती उघड होणार याकडे सर्व माध्यमांचे लक्ष लागून आहे.