मुंबई – मुंबईमध्ये एका 16 वर्षीय तरुणीने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने हे टोकाचे पाऊल भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादावरून उचलले आहे.
A 16-year-old girl consumed poison and died following a spat with her brother over playing video game on the phone. The girl was short-tempered, she died during treatment. The family could afford only one phone: Sub-inspector Santosh Kharde, Samta Nagar PS, Mumbai#Maharashtra pic.twitter.com/sSBqRnq5X1
— ANI (@ANI) September 12, 2021
मोबाईल गेम खेळत असताना तरुणीचा तिच्या भावासोबत वाद झाला त्यातून तिने रागाच्या भरात उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी लगेच तरुणीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास तरुणी व तिच्या लहान भावासोबत मोबाईलवर गेम खेळण्यावरुन वाद झाला. भावाने मोबाईल न दिल्यामुळे तरुणीला राग अनावर झाला दरम्यान जवळच असलेल्या मेडिकल स्टोअरमधून उंदीर मारण्याचं औषध तिने आणले. व भावासमोरच हे औषध घेतलं.
हा सर्व प्रकार भावाने आईवडिलांना सांगितला त्यानंतर त्यांनी तिला तात्काळ तरुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी समता नगर पोलिस पुढिल तपास करत आहेत.