Mumbai Municipal Commissioner : मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. साडेतीन वर्षांनंतर मुंबईला महापौर मिळणार असून, हालचालींना वेग आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईच्या महापौराची घोषणा केली जाणार आहे. अशातच आता मुंबई पालिकेला नवीन आयुक्त मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईचा महापौर आणि पालिका आयुक्त ( Mumbai Municipal Commissioner)कोण होणार याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. सध्या मुंबई महापालिकेवर भूषण गगरानी हे आयुक्त पदावर कार्यकरत आहेत. ते दोन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी कोण येणार याबद्दल एक नाव चर्चेत आहे. मिलिंद म्हैसकर हे मुंबईचे नवे आयुक्त होणार अशी चर्चा असून, शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. हेही वाचा : Girish Mahajan : “बाबासाहेबांचं नाव घेण्याची लाज वाटत असेल तर यांना देशात राहण्याचा अधिकार आहे का?” सध्या कार्यकत असलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी हे १९९९ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. ते मार्च २०२४ पासून मुंबईचे आयुक्त आहेत. महापालिकेवर प्रशासन म्हणून भूषण गगरानी यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. ते मार्च २०२६ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. सध्या मुंबई महापालिकेचे भूषण गगरानी हे आयुक्त आहेत. भूषण गगरानी हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी पालिका आयुक्त पदी मिलिंद म्हैसकर यांना संधी मिळू शकते. ११९२ च्या बॅचचे अधिकारी असलेले मिलिंद म्हैसकर यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी-टेक पदवी संपादन केली आहे. सध्या ते महाराष्ट्र सरकारचे एडीशनल चीफ सेक्रेटरी (फॉरेस्ट), रेवेन्यू एंड फॉरेंस्टची जबाबदारी सांभाळत आहेत. मिलिंद म्हैसकर यांच्या पत्नी मनीषा म्हैसकर यांच्या देखील नावाची चर्चा मुंबई महापालिकेसाठी होत आहे. त्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. त्यांच्या नावाची चर्चा असून, त्यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी वर्णी लागू शकते. हेही वाचा : Alankar Agnihotri : UGC नियमांविरुद्ध राजीनामा दिल्याने दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री निलंबित ; प्रशासनाकडून ओलीस ठेवल्याचा केला होता आरोप