मुंबई – भारतातील बॅंकांना अब्जावधी रूपयांचा चुना लाऊन विदेशात फरारी झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मुंबईतील मालमत्तांवरील कर मोठ्या प्रमाणावर थकला आहे. त्या थकबाकीचे एकूण 9 कोटी 60 लाख रूपये वसुल करण्यासाठी मुंबई महापालिकेने त्याच्या मुंबईतील चार पैकी तीन मालमत्ता जप्त केल्या आहेत.
या मालमत्ता सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे महापालिकेने ईडीला हा कर भरण्याची सुचना केली आहे. या चार मालमत्तांपैकी तीन मालमत्ता कमर्शियल स्वरूपाच्या असून एक निवासी आहे.
यातील एक मालमत्ता लोअर परेल भागात असून दुसऱ्या दोन कमर्शियल मालमत्ता कुर्ला येथील कोहीनुर सिटीत आहेत. तर कलिना भागात त्याची रहिवासी मालमत्ता आहे. यापैकी तीन मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या असून त्याची चौथी मालमत्ताहीं जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे महापालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.