मुंबई बाजार समितीची निवडणूक एकत्रित लढणार- बाळासाहेब पाटील

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाची ची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढणार आहेत अशी माहिती
सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. आज याबाबत सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुबंईत बैठक झाली.

बैठकीला उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार, नगरविकास मंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री मा.श्री.जयंत पाटील, कृषी मंत्री मा.श्री. दादाजी भुसे, महसूलमंत्री मा.श्री. बाळासाहेब थोरात, आमदार श्री. संग्राम थोपटे आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते .

महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे असे आव्हान सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील केले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.