मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात लशीची चाचणी सुरु

मुंबई- ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टीट्युट यांच्या मार्फत कोव्हिशिल्ड लस बनवण्यात येत आहे. पुण्यानंतर आता मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात लशीच्या चाचणी सुरुवात केली आहे.

मुंबईतील केईएम रुग्णालयात आणि नायर रुग्णालयात 100 अशा एकूण 200 जणांना तिसऱ्या टप्प्यातील लस देण्यात येणार आहे. टप्याटप्याने 100 जणांना ही लस देण्यात येणार आहे.

जगभरात 18 ठिकाणी कोरोनाच्या लशीचंं काम सुरु आहे. काही लशींच्या चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टीट्युट यांच्या मार्फत कोव्हिशिल्ड लस चाचणीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत पुण्यात या चाचणीला सुरुवात केली होती. आता मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात या दोन रुग्णालयात 19 जणांना देण्यात आली आहे.

कोव्हिशिल्ड लस देण्यात आलेल्या 100 स्वंयसेवकांची एका महिन्यानंतर तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या निष्कर्षांवरुन पुढील प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्युट यांच्या मार्फत कोव्हिशिल्ड तिसऱ्या टप्प्यात आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल संस्था बनवत असलेली ‘कोवॅक्सीन’ लस मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. झायडस कॅडिला ही संस्था देखील लस बनवत असून त्यांच्याही लसीची चाचणी सुरु आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.