मुंबई : आज IPL 2022 स्पर्धेच्या 56 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स (KKR) अशी लढत होणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात कोलकाताला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्याचवेळी केकेआरचे समीकरण बिघडवण्यासाठी मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे. मुंबईचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून याआधीच बाहेर पडला आहे.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाणेफेक(टाॅस) जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून कोलकाता संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
#MumbaiIndians have won the toss and they will bowl first against #KKR.
Live – https://t.co/0TDNSwhQXs #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/ztC9mbiYQB
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
मुंबईचा कर्णधार रोहितने प्लेइंग-11 मध्ये फक्त एक बदल केला आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी रमणदीप सिंगचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दुसरीकडे कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघात पाच बदल केले आहेत. अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती आणि शेल्डन जॅक्सन यांचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे :
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग-11 : अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), पॅट कमिन्स, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती.
मुंबई इंडियन्स प्लेइंग-11 : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, रमणदीप सिंग, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाचे 10 सामन्यांत 04 गुण आहेत. मुबंईचा संघ जास्तीत जास्त 12 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. पण 12 गुण प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे नाहीत. दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरला शनिवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला. त्याचे 11 सामन्यात 08 गुण आहेत. केकेआरचा संघ उरलेल्या तीन सामन्यांमध्ये जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतो, परंतु तरीदेखील प्ले आॅफमध्ये त्यांना जागा मिळेल यांची खात्री नाही.