#KKRvMI – नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा निर्णय

कोलकाता – मागिल मोसमात साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यापासून केवळ एक पाऊल दूर असून आज त्यांच्य समोर बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान असणार आहे. कोलकाताच्या संघाला यंदाच्या मोसमातील आपले आव्हान टिकवून ठेवण्यास आजच्या सामन्यात विजय आवश्‍यक असून त्यांच्यासमोर आज “करा वा मरा’ची परिस्थिती असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सकडून लागला असून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता नाइट राइडर्स :

क्रिस लिन, सुनील नारेन, रॉबिन उथप्पा, शुबमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, रिंकु सिंह, आंद्रे रसेल, पियूष चावला, संदीप वारियर, हेरी गर्नी

मुंबई इंडियंस :

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, एविन लुईस, सूर्यकुमार यादव, क्रुणाल पांड्या, काइरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, बरिंदर सरान, राहुल चहर, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.