#IPL2019 : मुंबईचा कोलकाता नाईट रायडर्सवर एकतर्फी विजय

मुंबई  – आयपीएलच्या बाराव्या मोसमातील अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 9 गडी राखून पराभव करुन त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. मुंबईच्या विजयाने हैदराबादचा संघ बाद फेरीत दाखल झाला आहे.

बाद फेरी गाठण्यास आवश्‍यक असणाऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजीस करताना कोलकाताने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 133 धावांची मजल मारली. विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाने धमाकेदार सुरूवात केली. सलामीवीर डी कॉक आणि रोहित शर्मायांनी पहिल्या चेंडू पासूनच फटकेबाजी करत कोलकाताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे मुंबईने पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये बिनबाद 46 धावांची मजल मारली.

मात्र, पॉवर प्लेनंतरच्या पहिल्याच चेंडूवर डी कॉक बाद झाला. यानंतर उतरलेल्या सुर्यकुमार यादव आणि सलामीवीर रोहित शर्मायांनी फटकेबाजी करत 13.2 षटकांत संघाला शंभर धावांची मजल मारुन दिली. तर, 16.1 षटकांतच संघाला 134 धावांची मजल मारुन देत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी रोहितने नाबाद 55 आणि सूर्यकुमारने नाबाद 46 धावा केल्या.

तत्पूर्वी, कोलकाताने वेगवान सुरूवात केली. मात्र, सलामीवीर गिल 9 धावा करुन बाद झाला. यानंतर ठरावीक अंतराने बळी पडत गेल्याने कोलकाताची धावगती खालावली. यावेळी कोलकाताकडून सलामीवीर ख्रिस गिल 41, रॉबिन उथप्पा 40 आणि नितिश राणा 26 यांनी थोडाफार प्रतिकार करत संघाला 133 धावांची मजल मारुन दिली. यावेळी मुंबई कडून लसिथ मालिंगाने 3 तर हार्दिक आणि बुमराह यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.