#IPL2019 : मुंबईसमोर विजयीलय कायम राखण्याचे आव्हान

पराभवाच्या छायेतून राजस्थानला बाहेर पडण्याची संधी

-रोहित शर्मा सामन्यासाठी उपलब्ध असणार
-दोन्ही संघांना फलंदाजीत सुधारणा करणे गरजेचे

मुंबई -आयपीएलच्या बाराव्या मोसमात प्रथमच मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ समोरासमोर येणार असून मुंबई इंडियन्स समोर आपली विजयीलय कायम राखत लागोपाट चौथा विजय मिळवण्याचे आव्हान असणार आहे. तर, सातत्याने पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या राजस्थानच्या संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर पदण्याची ही अखेरची संधी असणार आहे.

मुंबई इंडियन्स Vs राजस्थान राॅयल्स

वेळ – दुपारी. 4 वाजता

स्थळ – वानखेडे मैदान, मुंबई.

आयपीएलच्या बाराव्या मोसमात आतापर्यंत मुंबईने आपल्या सहा सामन्यांमध्ये 4 विजय आणि 2 पराभव पत्करून आठ गुणांसह तिसरे स्थान पटकावले असून आजच्या सामन्यात विजय मिळवत मुंबईला दुसऱ्या स्थानी पोहोचण्याची संधी असणार आहे. तर, राजस्थान रॉयल्सच्या संघाने आपल्या सहा सामन्यांमध्ये केवळ एकच विजय मिळवला असून पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांना क्रमवारीत सातवे स्थान मिळाले असून आज जरी त्यांच्या संघाने विजय मिळवला तरी त्यांच्य क्रमवारीतील स्थानात विशेष फरक पडणार नसला तरी स्पर्धेतील आव्हान जिवंत राहण्यास आजचा विजय आवश्‍यक असणार आहे.

यावेळी मुंबईने आपल्या अखेरच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा अखेरच्या चेंडूवर पराभव करत आगेकूच केली होती. ज्यात दुखापतीमुळे सामन्याला मुकलेल्या रोहित शर्माची कमतरता सर्वांनाच भासली तरी कायरन पोलार्डने 31 चेंडूंमध्ये 83 धावांची तडाखेबाज खेळी साकारत मुंबईचा विजय सुकर केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात पोलार्डच्या कामगिरीकडे सर्वांचे विशेष लक्ष असले तर, पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे पंजाबने मुंबई समोर 197 धावांचे भलेमोठे आव्हान उभे केले होते. ज्यात ख्रिस गेलने 63 तर राहुलने 100 धावांची खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांचे वाभाडे काढले होते.

दुसरीकडे राजस्थानने बंगळुरू वगळता इतर सर्व संघांसमोर पराभव पत्करला असून त्यांना पहिल्या सामन्यापासून चांगल्या सुरुवातीनंतरही अखेरच्या क्षणी कामगिरीत सातत्य न राखल्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवायचे असल्यास त्यांना आजच्या सामन्यात विजय आवश्‍यक असून त्यांच्या संघाला चांगली कामगिरी करावी लागेल.

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्‍लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, रसिक सलाम, अल्झारी जोसेफ.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एश्‍टॉन टर्नर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.