#MIvKXIP : पहिल्या सामन्यातील पराभवाचा मुंबई बदला घेणार का ?

मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब

वेळ – रा. 8.00 वा
स्थळ – वानखेडे मैदान, मुंबई

मुंबई – आयपीएलच्या बाराव्या मोसमात आता पर्यंत संमिश्र कामगिरी नोंदवलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघासमोर आतापर्यंत उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान असणार आहे.

मुंबईने या मोसमात आपल्या पाच सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे तर तीन सामन्यांमध्ये मुंबईने विजय मिळवला आहे. यात पंजाबने मुंबईला मोहाली येथे झालेल्या सामन्यात सहज पराभुत केले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात पंजाबच्या संघाला हरवून पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी मुंबईच्या संघाकडे असणार आहे. तर, पंजाबने आतापर्यंत सहा सामन्यांमधील 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ते आठ गुणांसह क्रमवारीत तिसऱ्यास्थानी असून आजच्या सामन्यात मुंबईच्या संघाचा पराभव करत क्रमवारीत आघाडीचे स्थान पटकावण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.

यावेळी मुंबई इंडियन्सची मोसमाची सुरूवात पराभवाने झाली. तर, दुसऱ्या सामन्यात त्यांनी बंगळुरूचा पराभव करत पुनरागमन केले. मात्र, त्यानंतर पंजाबने मोहाली येथे झालेल्या सामन्यात मुंबईचा पराभव करत मोहाली येथे सहा वर्षांनंतर मुंबईच्या संघाचा पराभव करण्याची किमया केली होती. मात्र, त्यानंतर मुंबईच्या संघाने घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा तर हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत आगेकूच नोंदवली. यावेळी दोन्ही सामन्यात मुंबईच्या संघातील फलंदाजांची आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी अखेरपर्यंत चांगली खेळी केरत मुंबईला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली होती.

तर, त्यांच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवत मुंबईला विजय मिळवून दिला. त्यात वेस्ट इंडिज व मुंबईचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या अल्झारी जोसेफने हैदराबादच्या सहा गड्यांना केवळ 12 धावांमध्ये बाद करत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या कामगिरीकडे सर्वंचे लक्ष्य असणार आहे.

तर, दुसरीकडे पंजाबने मालिकेतील पहिल्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात कोलकाता विरुद्ध त्यांना मोठ्या फरकाने पराभुत व्हावे लागले. तर, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात त्यांनी अनुक्रमे मुंबई आणि दिल्लीच्या संघांचा पराभव करत क्रमवारीत पहिले स्थान पटकावले होते. मात्र, पाचव्या सामन्यात त्यांना चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी हैदराबाद विरुद्धचा सामना अखेरच्या षटकात जिंकत पंजाबने आगेकूच नोंदवली.

यावेळी पंजाबच्या दृष्टीने सर्वात आनंदचे गोष्ट म्हणजे त्यांचा सलामीवीर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लयीत आला असून त्याच्य सोबतच मधल्याफळीतील फलंदाज मयंक अग्रवाल देखील आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावीत करत आहे. त्याच बरोबर त्यांच्यसंघातील फिरकी गोलंदाज देखील प्रतिस्पर्धी संघावर अंकुश राखत त्यांना धावा करण्यापासून रोखुन धरण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला विजय मिळवणे अवघड असून जर त्यांना अज पंजाबच्या संघाचा पराभव करायचा असेल तर त्यांच्या सलामीवीरांना चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्‍लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, रसिक सलाम, अल्झारी जोसेफ.

किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.