#IPL2019 : मुंबई इंडियन्सची शानदार विजयी मिरवणूक

मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपरकिंग्सला एका धावेने पराभूत केले आणि आयपीएल स्पर्धेत विजेतेपदाचा चौकार लगावला.

अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले.

अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.

कर्णधार रोहित शर्माच्या टीमने चौथ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरल्यानंतर मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात मुंबई इंडियन्स संघाची ‘विजयरथा’वरून मिरवणूक काढण्यात आली होती.

यावेळी मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.