मुंबई: इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आगामी मोसमासाठी विविध संघांनी अनेक स्टार खेळाडूंना लिलावासाठी करारमुक्त केले आहे. मुंबई इंडियन्सने मात्र अनपेक्षितपणे स्टार खेळाडू युवराजसिंग यालाच डच्चू दिला आहे.
युवराजसह मुंबईने एकूण बारा खेळाडूंना करारमुक्त केले आहे. या खेळाडूंची यादीही जारी करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये चौथ्यांचा विजेतेपद मिळवून देणारे प्रमुख खेळाडू मुंबई इंडियन्सने रिटेन करण्याचा निर्णय घेतला असला तरी युवराजची गच्छंती अनपेक्षित होती. मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये ट्रेंट बोल्ट, स्टेफाने रुदरफोर्ड आणि धवल कुलकर्णीचाही समावेश आहे.
आयपीएल 2020 साठी 19 डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आयपीएलच्या प्रत्येक मोसमाचा लिलाव यंदा बंगळुरू ऐवजी कोलकात्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सने मयांक मार्कंडेय आणि सिद्धेश लाड यांना अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडे ट्रेड-आऊट केले आहे. तसेच मुंबईने सहा आंतरराष्ट्रीय आणि चार भारतीय खेळाडूंनाही करारमुक्त केले आहे.
करारमुक्त केलेले खेळाडू : एविन लेविस, एडम मिलने, जेसन बेहरेनड्रॉफ, बेन कटिंग, युवराजसिंग, मयांक मार्कंडेय, बरिंदर सरण, रासिक सलाम, पंकज जसवाल, सिद्धेश लाड आणि अल्जारी जोसेफ गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सने युवराजसिंगला भरपूर रक्कम देत करारबद्ध केले होते, मात्र त्याची खालावलेली कामगिरी पाहता त्यांनी त्याला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला. गतवर्षी त्याला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चमक दाखविता आली नाही.
तसेच त्याला जेव्हा नंतर संधी मिळाली तेव्हा देखील तो दर्जाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. गतवर्षी सर्वात महागडा खेळाडू ठरलेला युवराज आता आगामी मोसमात कोणत्या संघाकडून खेळणार ते 19 डिसेंबरला कळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज विविध देशातील लीगमध्ये सहभाग घेत आहे.