मुंबईः ट्रेडमार्क आणि पेटंट कार्यालयाचे प्रशासन आणि वित्त विभाग दिल्लीला हलवण्यावरून आमदार आदित्य ठाकरे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यात ट्वीटर वॅार रंगल्याचे पाहिला मिळत आहे. या माध्यमातून ठाकरे- गोयल यांची या मुद्याला घेऊन शाब्दिक चकमक झाल्याचे पाहिला मिळत आहे.
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या एक्सच्या अकाउंटवरून एक पत्र ट्वीट केले. त्या पत्रात पेटंट, डिझाइन आणि ट्रेड मार्कच्या कंट्रोलर यांना अरुण कुमार गुप्ता यांनी लिहिले होते. यामध्ये आदित्य ठाकरे यांनी आमच्या राज्यांने केंद्र सरकारला दिलेल्या योगदानासाठी केंद्राकडून आमचा योग्य वाटा मागू नये, असे त्याच मंत्र्यांना वाटते. हे मुख्यालय हलवण्याची काय गरज होती असा प्रश्न उपस्थित केला.
यावर तुमची आक्रमकता बालिशपणाचे आणि अर्धवट माहितीच्या आधारे आहे. अशा अतिउत्साही आक्रमकतेमुळेच महाराष्ट्राच्या लोकांनी तुम्हाला सत्तेत येऊ देण्यास अयोग्य मानले, असा आदित्य ठाकरेंच्या पोस्टला गोयला यांनी रिप्लाय दिला. त्यावर ठाकरे-गोयल यांच्यात शाब्दिक चकमक पाहिला मिळाली.
आदित्य ठाकरे ट्वीटमध्ये काय म्हणाले ?
मुंबईने खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्याने किती लज्जास्पद कृत्य केले आहे. ज्यांनी त्यांना निवडून दिले, अशा मुंबईचे ते विश्वासघात करत आहेत. भाजपच्या प्रत्येक कृतीत मुंबईचा अपमान होतो आहे. नंतर ते आमच्या जखमांवर मीठ चोळतात. आमच्या राज्यांने केंद्र सरकारला दिलेल्या योगदानासाठी केंद्राकडून आमचा योग्य वाटा मागू नये, असे त्याच मंत्र्याला वाटते. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकेरेंच्या ट्वीटला पियुष गोयलांचा रिप्लाय
तुमची आक्रमकता बालिशपणाचे आणि अर्धवट माहितीच्या आधारे आहे. अशा अतिउत्साही आक्रमकतेमुळेच महाराष्ट्राच्या लोकांनी तुम्हाला सत्तेत येऊ देण्यास अयोग्य मानले. तुमच्या माहितीसाठी ट्रेडमार्क आणि पेटंट कार्यालयाचे मुंबई मुख्यालय शहरातून काम करत राहील. प्रशासन आणि वित्त विभागाचे कार्यालय दिल्लीत असेल, असा आदित्य ठाकरेंच्या ट्वीटला पियूष गोयल यांनी रिप्लाय दिला.