लंडनच्या धर्तीवर साकारणार ‘मुंबई आय’- उपमुख्यमंत्री

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीला जागतिक दर्जाचे शहर बनवितानाच जगभरातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी लंडनच्या धर्तीवर ‘लंडन आय’प्रमाणे वांद्रे-वरळी सी लिंक येथे लवकरच ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केली.

पर्यटन क्षेत्रात मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळानेही तत्काळ मंजुरी देऊन याविषयीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले, आहेत अशी माहिती पवार यांनी दिली.

थेम्स नदीच्या काठावरील ‘लंडन आय’प्रमाणे मुंबईतही ‘मुंबई आय’ उभारण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर याविषयीची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. लंडनच्या धर्तीवर मुंबई आय उभारल्यास इथेही पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल.

लंडन येथील लंडन आय याने जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. तो बघण्यासाठी लाखो पर्यटक त्याठिकाणी भेट देत असतात. त्याच धर्तीवर मुंबईच्या समुद्रातही लंडन आय उभारण्यात येणार आहे.

वांद्रे वरळी सील लिंकवरून जाताना माहीमच्या दिशेला सी लिंकच्या टोल नाक्‍या शेजारी असणाऱ्या जागेत हे मुंबई आय सुरु करण्याचा विचार सुरु आहे. त्याबाबत लवकरच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

काय आहे लंडन आय
लंडन आय हा लंडन शहरामधील एक अजस्त्र पाळणा (जायंट व्हील/फेरिस व्हील) आहे. थेम्स नदीच्या काठावरील लंडन आय हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

या ठिकाणी दरवर्षी सुमारे 35 लाख पर्यटक भेट देतात. 135 मीटर उंचीचा हा पाळणा 31 डिसेंबर 1999 रोजी खुला करण्यात आला. ह्याच्या बांधकामासाठी सुमारे 7 कोटी पाउंड इतका खर्च आला. लंडन आयमध्ये 32 अंडाकृती आकाराच्या कूप्या आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.