मुंबई,दि. 26 – मुंबईतील भांडुप उपनगरात एका मॉलमध्ये असलेल्या हॉस्पीटलमध्ये उपचार घेणाऱ्या आठ रुग्णांचा मध्यरात्री अचानक लागलेल्या होरपळून मृत्यू झाला. मात्र, अन्य 70 जणांना तेथून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. करोनामुळे मरण पावलेल्या दोघांचे मृतदेहही आढळले आहेत. या आठ जणांचा आगीत भाजल्याने आणि धुरामुुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हफीज रेहमान म्हणअले, या घटनेनंतर काही रुग्ण बेपत्ता आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे आणि त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. करोनाने मरण पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आग लागण्यापुर्वी त्याची कल्पना देण्यात आली होती.
या घटनेनंतर 30 रुग्णांना मुलुंडच्या जंबो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले. त्यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघे अतिदक्षता विभागात असून अन्य दोघांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर करोना नसणाऱ्या रुग्णांना फोर्टीस हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले आहे. तीन मजली ड्रीम मॉलच्या पहिल्या मजल्यावर गुरूवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली.
मॉलची ही इमारत तीन मजली असून हे हॉस्पीटल तेथे तिसऱ्या मजल्यावर आहे. तेथे एकूण 76 पेशंट आहेत आणि त्यातील बहुतेक जण कोविड पेशंट आहेत. हॉस्पिटलचा फायर अलार्म वाजू लागताच रुग्णांना आगप्रतिबंधक क्षेत्रातून सुरक्षितस्थळी लवण्यात आले. गेल्या वर्षी करोना साथीच्या काळात अपवादात्मक स्थितीत हे रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेक बाधितांना जीवदान मिळाले आहे. अग्नीशामक परवानगी, रुग्णालया सुरू करण्याचा परवाना मिळवल्यानंतर हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे, असे रुग्णालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
राज्याचे मुखमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. यात निष्काळजीपणा अथवा दिरंगाई झाली असल्यास तो शोधून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा त्यांनी केली.
रुग्णालयातून सर्व दाखल असणाऱ्या रुग्णांना हलवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र व्हेंटिलटेर असणाऱ्या रुग्णांना हलवण्यात थोडा वेळ लागला. दुर्देवाने त्यात त्यांचा मृत्यू झाला. अलीकडेच मी सर्व करोना केअर सेंटर आणि रुग्णालयांचे फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. अशा घटना घडू नयेत, असे प्रशासनाला आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही हा प्रकार घडला. यात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो, असे ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मरण पावलेल्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. या घटनेने मला दु:ख झाले असून मी यात जखमी झालेल्यांना लवकर बरे वाटावे म्हणून मी प्रअर्थना करतो, असे पंतप्रदानांनी म्हटले आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली ते अजून उमगले नाही. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे 14 बंब आणि 10 पाण्याचे जंबो टॅंकर तेथे पाचारण करण्यात आले. रूग्णांना हलवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रूग्णवाहिकाही तेथे नेण्यात आल्या होत्या. त्यामुळे रूग्णांना तेथून पटकन हलवणे सोपे गेले. या रूग्णांना वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्या म्हणाल्या की आगीचे निश्चित कारण समजले नाही. त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मॉल मध्येही हॉस्पीटल असते हे येथे मला पहिल्यांदाच समजले. तथापि तातडीची बाब म्हणून गेल्या वर्षी येथे कोविड काळात हे हॉस्पीटल उभारण्यास तेथे अनुमती देण्यात आली होती.