मुंबई उच्च न्यायालयाचा सोनू सूदला दणका ! काय आहे प्रकरण वाचा एका क्लिकवर

BMC विरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळली

मुंबई –  अभिनेता सोनू सूद विरोधात जुहू पोलीस ठाण्यात मुंबई महापालिकेच्या (BMC) वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. सोनू सूदच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आल्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे.  

पालिकेच्या या कारवाईला सोनू सूद (Sonu Sood) कशा प्रकारे सामोरा जाईल याकडे आता लक्ष असतांनाच त्याने बीएमसीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.  ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

तत्पूर्वी सोनूने या प्रकरणात आपली बाजू  मांडत  पालिका आपल्याबरोबर भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. मी राहत असलेल्या इमारतीमध्ये कुठलेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही.  या इमारतीचे बांधकाम बांधकाम १९९२  मध्ये झाले आहे .  तेव्हापासून ही इमारत आहे तशीच आहे. असे ही त्याने म्हंटले होते.  यातच याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे  पालिकेच्या या कारवाईला सोनू सूद कशा प्रकारे सामोरा जाईल याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.