भिवंडीत गोदाम कोसळले; ढिगाऱ्याखाली 7-8 मजूर अडकल्याची भीती

ठाणे – भिवंडीतील मानकोली परिसरातील हरीहर कम्पाउंडमधील गोदाम कोसळले. ही दुर्घटना आज सकाळी 10.25 वाजता घडली. ढिगाऱ्याखाली सात ते आठ मजूर अडकल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच, भिवंडी केंद्रातून अग्निशमनचे तीन बंब घटनास्थळी पोहोचले आहेत.

मानकोलीमधील हरीहर कम्पाउंड येथील प्लॉट क्रमांक ए – 8 येथील तळ अधिक एक मजली गोदाम आज सकाळी 10.25 वाजता अचानक कोसळले. यावेळी गोदामात काम करणारे सात ते आठ मजुर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या दुघर्टनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थी धाव घेतली. याशिवाय, ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे अग्निशमन केंद्र आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकाला (टीडीआरएफ) मदत आणि बचावकार्यासाठी रवाना करण्यात आले आहे.

एनडीआरएफ पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. अग्निशमन दलाकडून अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कोणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.