मुंबई – अहमदनगर पाठोपाठ मुंबईतही आगीची आणखी एक घटना घडली. या आगीत दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 7 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे.
कांदीवली पश्चिम भागात मथुरादास मार्गावरील हंसा हेरिटेज ही 15 मजल्यांची इमारत आहे.
या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर आग लागली होती. दिवाळीनिमित्त लावलेल्या पणतीमुळे पडद्याने पेट घेतला आणि त्यामुळेच आग लागली असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.
या आगीत दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या सात वाहनांनी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, या आगीत दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकर यांनी कांदिवलीत आग लागलेल्या हंसा हेरिटेज इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबईत कांदिवली भागात हंसा हेरिटेज या रहिवाशी इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीमुळे इमारतीत अडकलेल्या 7 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. ही आग रात्री साडेआठच्या सुमारास पंधरा मजल्याच्या इमरतीच्या 14 व्या मजल्यावर लागली होती. दरम्यान, आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.