होय शक्‍य आहे!!! मुंबईहून दिल्लीला रस्त्याने 12 तासात जाणे…

"सागरमाला' योजनेतील सर्वात महत्त्वाकांक्षी रस्ता प्रकल्प

नवी दिल्ली – केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई-दिल्ली रस्ता वेगाने विकसित करण्यात येत असून 1250 किमी लांबीच्या या सर्वात मोठ्या राष्ट्रीय महामार्गामुळे मुंबईहून दिल्लीला रस्त्याने 12 तासांत पोहोचणे शक्‍य होणार आहे. सध्या या अंतरासाठी किमान 24 ते 26 तासांचा अवधी लागतो. या रस्त्यामुळे महामार्गाचे अधिक सक्षम आणि विस्तृत होण्यास मदत होणार असून अन्य मार्गांनाही या महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. पाहूया काय आहेत वैशिष्टये या रस्त्याची…

 1. महाराष्ट्र (120 किमी), गुजरात (300 किमी), मध्य प्रदेश (370 किमी), राजस्थान (380 किमी) आणि हरयाणा (80किमी) या पाच राज्यांतून जाणार महामार्ग
 2. संपूर्ण रस्ता होणार आठ पदरी
 3. वर्ष 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार
 4. मुंबईमध्ये मीरा-भाईंदर आणि गुरगावमध्ये सोहनाजवळ जंक्‍शन उभारणार
 5. मुंबईजवळील जवहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ते विरारपर्यंत एक एक्‍सटेंशन – 91 किमी

 6. दिल्ली ते सराये कालेखान ते गुरगाड दुसरे एक्‍सटेंशन – 59 किमी

 7. विद्यमान मुंबई-दिल्ली सहा पदरी राष्ट्रीय महामार्गावर दररोज 80,000 वाहनांची वाहतूक
 8. गुरगाव, मेवाड, अलवार, मंदसौर, दाहोद, वडोदरा, मुंबई असा मार्ग
 9. 150 किमी अंतर कमी होणार
 10. 24 ऐवजी 12 तासांत प्रवास पूर्ण होणार

 11. मुंबई-वडोदरा प्रकल्प या नव्या प्रकल्पात विलीन

 12. 120 किमी वेगमर्यादा असेल
 13. वाहतूक भविष्यात वाढल्यास 12 पदरी रस्ताविस्तार करता येणार
 14. एक लाख कोटी रुपयांचा विकास प्रकल्प
 15. 60,000 कोटी रुपये बांधकामाला, 40,000 कोटी रुपये भूसंपादनासाठी

 16. मुंबई-वडोदरा आरसीसी रस्ता, गुरगाव-वडोदरा रस्ता डांबरी

 17. 40 टक्के सरकारची गुंतवणूक; 60 टक्के खासगी गुंतवणूक
 18. टोल सरकार गोळा करणार; खासगी कंपनी नाही
 19. मालवाहतुकीच्या खर्चात 8 ते 10 टक्के बचत
 20. 15 हजार हेक्‍टर्स जमिनीचे भूसंपादन

 21. 5 लाख टन स्टील, 35 लाख टन सिमेंटचा वापर

 22. रस्ता जेवढा वापराल, तेवढ्याच अंतराचा टोल द्यावा लागणार; सरसकट नव्हे
 23. 76 ठिकाणी अन्य वाहतूक सुविधा, पेट्रोल पंप्स, हॉटेल्स आणि हेलिपॅड्‌स
 24. रणथंबोर आणि रामगड व्याघ्र प्रकल्पांतून जाणार रस्ता
 25. अभयारण्य क्षेत्रात 8 वाईल्डलाईफ क्रॉसिंग्ज

 26. 15 लाख झाडे लावणार; 32 कोटी लिटर इंधन वाचणार

 27. रेन वॉटर हार्वेस्टींग, सोलर लाईट्‌सचा वापर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.