अखेर ठाण्यातला पत्री पुल बांधून तयार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन

ठाणे  – ठाण्यातला बरेच दिवस चर्चेत असलेला पत्री पुल बांधून तयार झाला असून येत्या 25 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन होणार आहे. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्याचे उद्‌घाटन करतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार कल्याण शिंदे यांनी पत्रकारांना दिली.

Mumbai: CM Uddhav Thackeray to inaugurate Patri Pool bridge in Kalyan on Jan 25

कल्याण आणि डोंबिवलीला जोडणारा हा ब्रिटीश कालीन पुल आहे. तो सन 1914 साली बांधण्यात आला होता. पण अलिकडे तो मोडकळीला आल्याने तो धोकादायक बनला होता. त्यामुळे नोव्हेंबर 2018 मध्ये तो पाडण्यात आला.

त्यानंतर मात्र त्याच्या पुनर्रंबांधणीत वळोवेळी अनेक अडथळे आले होते. त्यामुळे पुल कधी सुरू होणार याची नागरीकांना आतुरतेची प्रतिक्षा होती कल्याण आणि डोंबिवलीत राहणाऱ्या हजारो नागरीकांना या अर्धवट पुलामुळे खूपच त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे तेथील नागरीकांनी या पुलाच्या बांधकामाविषयी सोशल मिडीयावरही मोठी मोहीम सुरू केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.