गँगस्टर ‘मचमच’च्या नावे 50 लाखांच्या खंडणीची मागणी

मुंबई : मुंबईतील एका बड्या व्यावसायिकाला अंडरवर्ल्ड गँगस्टरच्या नावे खंडणीसाठी फोन आला आहे. कुख्यात डॉन फहीम मचमच याच्या नावाने बिझनेसमनला धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे. फहीम मचमच हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगचा सदस्य आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

मुंबईतील घाटकोपर भागात राहणाऱ्या एका बड्या व्यावसायिकाला अंडरवर्ल्ड गँगस्टर फहीम मचमचच्या नावाने धमक्या देण्यात आल्या आहेत. परदेशातून आलेल्या फोन कॉलद्वारे या गुंडाने 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.

व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर आता गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

फहीम मचमच हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगमधील छोटा शकीलचा हस्तक मानला जातो. खंडणीसाठी आलेला फोन हा VOIP इंटरनेट कॉल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांकडे असलेल्या फहीम मचमचच्या ऑडिओ सॅम्पलसोबत संबंधित कॉल जुळत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.