मुंबई – कोटयवधी रुपयांची कर चुकवेगिरी करणाऱ्या अनुज गुप्ता यास विलेपार्ले, मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. अनुज गुप्ता याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या पाच संस्थांच्या माध्यमातून त्याने चार वर्षात साधारण 270 कोटीहून अधिक रकमेची फक्त देयके खरेदी केल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, अनुज गुप्ता यास न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखविलेल्या या बोगस खरेदी देयकांतून या पाच कंपन्यांनी सुमारे 31 कोटीहून अधिक रकमेचा बोगस इनपूट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेत 11 कोटीहून अधिक रकमेचा प्रत्यक्ष परतावा प्राप्त केला होता.
सदर कंपन्यांनी ई-वे बिलमध्ये नावे दाखविलेल्या विविध वाहतूकदारांनी आपण या पाच कंपन्यांसाठी प्रत्यक्षात मालाची वाहतूक केली नसल्याची कबुली तपासात दिली आहे. तसेच पाच कंपन्यांकडे त्यांनी दावा केलेल्या एकूण मालापैकी फक्त 20% एवढया रकमेचा माल प्रत्यक्ष आढळून आला.