बडोदा : गोलंदाजीत शम्स मुलाणी आणि त्यानंतर फलंदाजीत पृथ्वी शाॅ याने फलंदाजीत केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर रणजी मोसमातील पहिल्या लढतीत मुंबईने बडोद्यावर ३०९ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईच्या खात्यात ६ गुण जमा झाले आहेत.
Mumbai Won by 309 Run(s) #BDAvMUM @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/yGciO0H0ov
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2019
मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी
बडोद्याचा पहिला डाव ३०७ धावांवर रोखत १२४ धावांची मजबूत आघाडी मिळवून दिली. बडोद्याकडून फलंदाजीत केदार देवधरने नाबाद १६० तर विष्णू सोळंकीने ४८ धावा केल्या. मुंबईकडून गोलंदाजीत शम्स मुलानीने पहिल्या डावात ९९ धावा देत ६ गडी बाद करत महत्वपूर्ण कामगिरी केली.
End Innings: Baroda – 307/10 in 70.1 overs (S I Sopariya 1 off 9, Kedar Devdhar 160 off 190) #BDAvMUM @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 11, 2019
त्यानंतर मुंबईने दुस-या डावात ‘पृथ्वी शाॅ’च्या २०२ आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद १०२ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर ४ बाद ४०९ धावांवर डाव घोषित करत बडोद्यासमोर ५३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
ICYMI: 19 fours and 7 sixes! @PrithviShaw's blistering double hundred powers Mumbai to 409/4d against Baroda.
Watch it here 👉👉https://t.co/Ko0zFfRuMu#BDAvMUM @paytm #RanjiTrophy pic.twitter.com/BaaIBSEagV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2019
दुस-या डावातही बडोद्याचे फलंदाज पहिल्या डावाप्रमाणे अपेक्षित फलंदाजी करू शकले नाही आणि बडोद्याचा दुसरा डाव ९ बाद २२४ वर संपुष्टात आला आणि मुंबईने विजय संपादित केला. केदार देवधर दुखापतीमुळे दुस-या डावात फलंदाजी करू शकला नाही.
S Z Mulani 4 WICKETS! (16.4-1-72-4), Baroda 224/9 #BDAvMUM @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2019
मुंबईकडून शम्स मुलानीने पहिल्या डावाप्रमाणे पुन्हा एकदा दुस-या डावात शानदार गोलंदाजी करत ७२ धावांत ४ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तर शंशांक आणि आकाशने प्रत्येकी २ गडी बाद महत्वपूर्ण कामगिरी बजावली.