मुंबई – करोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईत होळी आणि त्यानंतर येणारे धुलीवंदन साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. खासगी अथवा सार्वजनिक अशा कोणत्याही प्रकारे हा उत्सव साजरा केला जाऊ नये, असे मुंबई महापालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांत नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांनुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. होळी आणि धुलिवंदन हे सण राज्यात मोठ्या उत्साहात आणि एकत्रितपणे साजरे केले जात असतात.
त्यासाठी मोठी गर्दी होत असते. या गर्दीमुळे करोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.