मुंबई – चेन्नई सुपर किंग्ज प्रमाणेच आता गतवर्षीचा आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्सचा संघही आज (शुक्रवारी) दुबईला रवाना होणार आहेत. हे दोन्ही संघ 19 सप्टेंबरला अमिरातीत आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सलामीचा सामना खेळणार आहेत.
मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी दुबईला जाण्यासाठी इच्छुक आहे आणि संघ प्रवासाच्या परवानगीची वाट पाहत आहेत. आयपीएल 2021 मधील उर्वरीत सामने अबूधाबी, शारजा आणि दुबई येथील मैदानावर खेळवले जाणार आहेत. बायोबबलच्या सुरक्षित वातावरणात करोनाचा संसर्ग झाल्यामुळे यंदाच्या स्पर्धेतील सामने स्थगित करण्यात आले होते.
मुंबई इंडियन्स संघ सीएसकेप्रमाणेच युएई सरकारकडून भारतातून युएईला प्रवास करण्याच्या परवानगीची वाट पाहत आहे आणि तेही शुक्रवारी युएईला जाऊ इच्छीत आहेत.
मुंबईच्या खेळाडूंचा प्रवास बबल-टू-बबल होईल, यानंतरही ते युएईत जाऊन करोना नियमांप्रमाणे विलगीकरणात राहतील. खेळाडू आधिपासूनच बायो-बबलमध्ये आहेत. त्यांनी सराव सुरू केलेला आहे त्यामुळे हा प्रवास बबल-टू-बबल होणार आहे.