Mumbai Accident । मुंबईच्या उपनगरातील विक्रोळी परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहाजण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळीतील गोदरेज कंपनीच्या परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. मात्र, हा अपघात गाडी भरधाव वेगात असल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात Mumbai Accident ।
इनोव्हा कार रस्त्यावरुन जात असताना प्रचंड वेगात होती. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पलटी झाली. यानंतर कार काही अंतरापर्यंत फरफटत जाऊन सर्व्हिस रोडलगतच्या दुभाजकावर आदळली.
सहा जणांची प्रकृती गंभीर Mumbai Accident ।
यावेळी कारचा वेग इतका होती की गाडी दुभाजकाला धडकल्यानंतर तेथील स्ट्रीट लाईटचा खांबही खाली कोसळला. या अपघातानंतर जखमींना गाडीतून बाहेर काढून जवळच्या शासकीय रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
हेही वाचा
मेरठ इमारत दुर्घटना : 10 जणांचा मृत्यू ; 15 नागरिकांना बाहेर काढले, प्राण्यांसाठी बचाव सुरू