भिवंडी : भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृ्त्यू झाला असून अकरा जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील टीडीआरएफ (TDRF) तसेच एनडीआरएफ (NDRF) चे जवान मदत कार्यात गुंतले आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
#UPDATE Maharashtra: Death toll rises to 10 in the building collapse incident in Bhiwandi, Thane which took place earlier today.
Rescue operation by NDRF (National Disaster Response Force) still underway. pic.twitter.com/MXHBlJQWWg
— ANI (@ANI) September 21, 2020
शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड इथली ही तीन मजली जीलानी इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून दुर्घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडल्याने, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
#WATCH Maharashtra: Rescue operation by NDRF (National Disaster Response Force) underway at the site of building collapse in Bhiwandi, Thane.
Eight people have lost their lives in the incident which took place earlier today. pic.twitter.com/dFvXwhHPH3
— ANI (@ANI) September 21, 2020
सुमारे तीस वर्षे जुनी जीलानी बिल्डिंग धोकादायक म्हणून महानगरपालिकेने घोषित करुन या इमारतीस दोन वेळा नोटीस बजावण्यात आली होती. दुर्घटनेत इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे गाडले गेले आहेत. अग्निशमन दल आणि ठाण्यातील टीडीआरएफ (TDRF) तसेच एनडीआरएफ (NDRF) चे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्या खालून 12 जणांना बाहेर काढले असून त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढले आहे. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.