मुंबई – लालबागच्या वन अविघ्न पार्क इमारतीच्या 19 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्तसमोर आले आहे. आगाची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व 20 गाड्या दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रर्यंत सुरु करण्यात आले आहे.
Mumbai | Level 3 fire broke out at Avighna park apartment, Curry Road around 12 noon today. No injuries reported: Mumbai Fire Brigade
— ANI (@ANI) October 22, 2021
करी रोडच्या वन अविघ्न पार्क टॉवर्सच्या 19 व्या मजल्यावर भीषण आग आग लागली असून ही आग 25 व्या मजल्यापर्यंत पोहचली आहे. वन अविघ्न पार्क टॉवर्समध्ये एकूण 60 मजली इमारत आहे. या घटनेत 19 व्या मजल्यावरुन एक व्यक्ती खाली पडला आहे. काही जण जखमी झाले आहेत. ही आग मध्यभागी लागल्यामुळे वरच्या आणि खालच्या मजल्यावर आग पसरु शकण्याची शक्यता आहे.
आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडेणेकर व स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.