बोरीवली – बोरीवली येथील एका रहिवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. येथील गांजावाला लेनमधील गांजावाला रेसिडन्सी इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली आहे.
#WATCH | Mumbai: A fire broke out in the seventh storey of a building in Borivali. It was brought under control after fire brigade officials rushed to the spot. One fire official was injured during the operation and shifted to a hospital. Further details awaited. pic.twitter.com/fvG5mVHtNi
— ANI (@ANI) September 4, 2021
आगीची माहिती मिळाल्यावर तात्काळ अग्निशमन दलाच्या 4 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जवानांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या आगीमध्ये इमारतीचा सातवा मजला पूर्णपणे जळून खाक झाला असून आग विझवताना अग्नीशमन दलाचा एक जवान जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या जवानाला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही इमारत पेट्रोल पंपाशेजारी असल्याने पंपावरील काम बंद करण्यात आले आहे.