लालबाग राजाच्या विसर्जनादरम्यान बुडालेल्या साईशचा मृतदेह सापडला

मुंबई – लालबाग राजाच्या विसर्जनादरम्यान बोट बुडाल्याचा अपघात समोर आला होता. या अपघातात 6 ते 8 जण पाण्यात बुडाले होते. यापैकी 5 वर्षीय साईश मर्दे या लहान मुलाचा शोध लागला नव्हता. त्यानंतर सलग सहा दिवस नौदल आणि तटरक्षक दल हे हेलिकाॅप्टरच्या मदतीने साईशचा शोध घेत होते. अखेर आज राजभवनाजवळच्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला आहे.

साईश हा गणपती विसर्जनादिवशी आई-वडिलांसोबत लालबाग राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी लालबाग येथे त्याच्या मामाकडे आला होता. त्यावेळी बोटीतून साईश हा त्याच्या आई-वडिलांसोबत लालबाग राजाला निरोप देण्यास गेले असता ही दुर्घटना घडली. बोटीतील वजन वाढल्याने बोट बुडाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात होताक्षणीच जीवन रक्षकांनी समुद्रात उड्या घेत लोकांना वाचवंल होतं. पण यामध्ये साईश मर्दे या मुलाचा शोध लागला नव्हता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर आज सहा दिवसानंतर आज राजभवनाच्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला. विसर्जनाच्या दिवशी त्यांन परिधान केलेल्या टी-शर्टवरून त्याची अोळख पटली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)