31 डिसेंबरच्या पार्टीतील तरूणीच्या हत्येनंतर आशिष शेलारांचं ट्विट; म्हणाले…

मुंबई – नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह देशभरात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. अशाच एका मुंबईतील खार परिसरातील पार्टीत 19 वर्षीय तरूणीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. जान्हवी कुकरेजा असे हत्या झालेल्या तरूणीचे नाव असून याप्रकरणी तिच्या बाॅयफ्रेंडसह एका मुलीला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणाबाबत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत एक मागणी केलीय.

“खारमध्ये नववर्ष स्वागत पार्टीमध्ये तरूणीची हत्या झाल्याची घटना खूपच वेदनादायी आहे. मृत तरूणीच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. याप्रकरणी मी पोलीस उपायुक्तांशी चर्चा केली असून तपास जलदगतीने व्हावा आणि गुन्हेगरांना तात्काळ अटक करावे अशी मागणी केलीय”, असे ट्विट शेलार यांनी केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

31 डिसेंबर रोजी मुंबईतील खारमधील भगवती हाईट्स या इमारतीच्या टेरेसवर नववर्षानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत संशयित आरोपी जोगधनकर (वय.22) आणि दिया पडणकर (वय,19) यांच्यासह जान्हवी कुकरेजा ही तरूणी सहभागी होती. पार्टीत मोठ्या आवाजात गाणी सुरू होती.

अचानक तिघांमध्ये भांडण सुरू झाले. भांडणाचे कारण कोणालाही समजले नाही. संशयीत आरोपींनी जान्हवीचे केस धरले व तिला फरफटत दुसऱ्या मजल्यावर नेले. त्यातच तिच्या डोक्याला मार लागला व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. पार्टीतील सर्वांनी दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली मात्र तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात जोगधनकर हा मुख्य संशयीत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.