#Prokabaddi2019 : यु मुम्बाचे दमदार पुनरागमन

पटणा पायरेट्‌सचा 34 -30 ने पराभव

अहमदाबाद – प्रो कबड्डी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात सांघिक खेळाचे दमदार प्रदर्शन करताना यू मुम्बाने विजयी मार्गावर पुनरागमन करताना बलाढ्य पटणा पायरेट्‌सचा 34-30 असा पराभव केला.

या सामन्यात रोहित बलियान आणि अतुल एमएस यू मुम्बाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. रोहितने 9, तर अतुलने 8 गुणांची वसूली केली. स्टार संदीप नरवालनेही अष्टपैलू खेळ करत 6 गुण मिळवले. मध्यंतरालाच मुंबईकरांनी 22-9 अशी भलीमोठी आघाडी घेत चित्र स्पष्ट केले. मात्र यानंतर पायरेट्‌सने जबरदस्त पुनरागमन करत सामन्यात रंग भरले. प्रदीप नरवाल, मोहम्मद मघसोदलौ यांनी मुंबईकरांना चांगलेच सतावले. मात्र त्यांची झुंज अपयशीच ठरली.

दोन्ही संघांनी एकमेकांवर प्रत्येकी एक लोण चढवला. मात्र चढाईमध्ये मुंबईने राखले वर्चस्व निर्णायक ठरले. या शानदार विजयासह यू मुम्बाने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.