नवी दिल्ली – भरमसाठ कमाईसाठी शेअर बाजार हा एकमेव आणि जबरदस्त पर्याय मानला जात आहे. आजकाल गुंतवणूकदार शेअर बाजारातून भरपूर कमाई करत आहेत. भागधारकांना बंपर परतावा मिळत आहे. अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना प्रचंड श्रीमंत केले आहे. एका शेअरनं तर 15 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे.
बालाजी अमाईन्स हा असाच एक शेअर आहे ज्याची किंमत आता प्रति शेअर 3672.95 रुपये झाली आहे. या रासायनिक शेअरची किंमत NSE वर 05 एप्रिल 2007 रोजी फक्त 28.42 रुपये प्रति शेअर होती. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी हा शेअर खरेदी करून संयम राखला त्यांना बंपर परतावा मिळाला आहे.
या शेअरचे रेकॉर्ड तपासले तर, गेल्या एका महिन्यात हा शेअर 3220 रुपयांवरून 3673 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच एकाच दिवसात जवळपास 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत बालाजी अमाईन्सच्या शेअरची किंमत सुमारे 2900 रुपयांवरून 3673 रुपयांपर्यंत वाढली आहे, या काळात जवळपास 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षभरातील रेकॉर्ड पाहिल्यास या शेअरची किंमत 1163 वरून 3673 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच सुमारे 215 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षांपूर्वी हा शेअर 345 च्या आसपास होता, म्हणजेच त्याने 970 टक्क्यांनी मोठी झेप घेतली आहे. 15 वर्षांपूर्वी हा शेअर 28.42 रुपये होता, जो आज 3673 रुपये प्रति शेअर झाला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज सुमारे 1.29 कोटी रुपये झाले असते.