पिरंगुट – मुळशी तालुक्यात आज 20 रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्ण संख्येने सातशेचा टप्पा पार केला आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 715 झाली आहे.
आज हिंजवडीत आठ, चांदेत तीन, नेरेत तीन, कासारसाईत दोन, भूगावमध्ये दोन, सुसमध्ये एक आणि अंबडवेटमध्ये एक असे 20 रुग्ण सापडले आहेत. सध्या 135 रुग्ण रुग्णालयात दाखल आहे.
आतापर्यंत 558 रुग्णांना घरी सोडलेले असून आज 56 रुग्ण घरी परतले आहेत. आतापर्यंत तालुक्यात 22 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.