मुळीक यांनी विकासाला गती दिली- पठारे

वडगाव शेरी – मतदारसंघात झालेली विकासकामे आणि मिळणारा प्रतिसाद पाहता, जगदीश मुळीक दुसऱ्यांचा निश्‍चित आमदार होणार, असा विश्‍वास राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले वडगावशेरीचे माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी व्यक्त केला.

वडगावशेरीत महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्या प्रचारार्थ फुलेनगर, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, शांतीनगर, प्रतीकनगर, जाधवनगर, इंदिरानगर भागांत पदयात्रा काढण्यात आली. यात पठारेही सहभागी झाले होते.

माजी नगरसेवक जालिंदर कांबळे, माजी नगरसेविका नंदा काबळे, मनसेचे सादिक शेख, अनिल राठोड आणि नितीन राठोड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, शीतल सावंत, अजय सावंत, फरजाना शेख, चंद्रकांत जंजिरे, संजय कदम, भगवान जाधव, पप्पू गोगले, सागर माळकर, आनंद गोयल, मंगेश गोळे आदी उपस्थित होते.

पठारे म्हणाले, वडगाव शेरीच्या विकासाला आमदार जगदीश मुळीक यांनी गती दिली. यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुळीक म्हणाले, खोट्या अफवा आणि सोशल मीडियावर चुकीची अफवा पसरवणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे. निवडणुकीमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला विरोधक जात आहे. नागरिकांच्या विकासापेक्षा स्वतःच्या विकासाची काळजी असणाऱ्या जनता घरी बसवेल, असा विश्‍वास मुळीक यांनी यावेळी व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)