मुलायम सिंह यादव यांचा बायोपिक 29 जानेवारीला होणार रिलीज

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्या जीवनावर आधारित “मै मुलायम सिंह यादव’ हा सिनेमा 29 जानेवारीला रिलीज होण्याची शक्‍यता आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील रिलीज करण्याची तयारी सुरू आहे. या सिनेमाचे निर्माता आणि दिग्दर्शकांसह सर्व टीम शुक्रवारीच लखनौला पोहोचली आहे.

आता लखनौमध्येच या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात होईल. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्‍वभुमीवर मुलायम सिंह यादव यांचा बायोपिक रिलीज करणे ही एक राजकीय चाल समजली जात आहे. अलीकडेच कोलकातामध्ये झालेल्या लिफ्ट इंडिया ऍवॉर्ड समारंभात “मै मुलायम सिंह यादव’ ला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. आता मुलायम सिंह यादव यांच्या निवासस्थानीच या सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे.

सिनेमात मुलायम सिंह यादव यांचा रोल अमित सेठी या कलाकाराने साकारला आहे. तर मुलायम सिंह यादव यांचे बंधू शिवपाल यादव यांचा रोल मिथुन चक्रवर्तीचा पुत्र मिमोह चक्रवर्तीने साकारली आहे. याशिवाय चौधरी चरण सिंह, राम मनोहर लोहिया यांच्याही व्यक्‍तिरेखाही या सिनेमात दर्शवल्या जाणार आहे. उत्तर प्रदेशातील राजकारणाला या सिनेमात खूप बारकाईने दर्शवले जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.